Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Rajat Patidar leads Central Zone to Duleep Trophy 2025 title : दुलीप ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात मध्य विभागाने दक्षिण विभागावर मात करून जेतेपद पटकावले. आरसीबी आणि मध्य विभागाचा कर्णधार रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखाली संघाने शानदार कामगिरी करत ट्रॉफी उचलली.
Rajat Patidar celebrates Central Zone’s Duleep Trophy 2025 triumph

Rajat Patidar celebrates Central Zone’s Duleep Trophy 2025 triumph

esakal

Updated on
Summary
  • दुलीप ट्रॉफी २०२५ फायनलमध्ये मध्य विभागाने दक्षिण विभागावर ६६ धावांचे लक्ष्य गाठत जेतेपद पटकावले.

  • पहिल्या डावात दक्षिण विभाग फक्त १४९ धावांवर गारद झाला; सारांश सिंग आणि कुमार कार्तिकेयने प्रत्येकी ५ विकेट्स घेतल्या.

  • मध्य विभागाने पहिल्या डावात ५११ धावा ठोकल्या; यश राठोड १९४ आणि रजत पाटीदारने १०१ धावा केल्या.

Central Zone vs South Zone Duleep Trophy 2025 highlights : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या जेतेपदानंतर रजत पाटीदारने कर्णधार म्हणून आणखी एक स्पर्धा जिंकली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मध्य विभागाने दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये दक्षिण विभागावर विजय मिळवला. मध्य विभागने ६६ धावांचे लक्ष्य चार गडींच्या मोबदल्यात सहज पार केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com