Vaibhav Suryavanshi, Rohit Sharma and Virat Kohli light up Vijay Hazare Trophy 2025.
esakal
Vaibhav Suryavanshi 190 runs record innings video Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या २०२५-२६ पर्वाला आजपासून धुमधडाक्यात सुरूवात झाली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व विराट कोहली ( Virat Kohli), हे भारतीय क्रिकेटमधील दिग्गज कित्येक वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी मैदानावर उतरले. याचवेळी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने १९० धावांची वादळी खेळी करून पुन्हा एकदा अनेक विक्रम नावावर केले. जबरदस्त फॉर्मात असलेल्या इशान किशननेही ३३ चेंडूंत शतक झळकावून वैभवचा विक्रम मोडला, पण बिहारच्याच साकिबुल गानीने ३२ चेंडूंत तिहेरी आकडा गाठला..