Haris Rauf controversy India vs Pakistan Asia Cup 2025
ESAKAL
आशिया कप २०२५ सुपर ४ सामन्यात हॅरिस रौफने भारतीय चाहत्यांकडे वादग्रस्त हावभाव केले.
सामन्यापूर्वीही रौफने सराव सत्रात ६-०, ६-० अशी नारेबाजी केली होती.
सामना सुरू असताना भारतीय चाहत्यांनी विराट कोहलीच्या नावाच्या घोषणा देताच रौफ चिडला.
ASIA CUP 2025 Haris Rauf mocking Indian supporters viral VIDEO : पाकिस्तानी कधी सुधारणार नाही, हे पुन्हा एकदा दिसले. आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ मधील लढतीत पाकिस्तानी खेळाडूंनी आपला खरा रंग दाखवला. साखळी फेरीतील लढतीत हस्तांदोलन प्रकरणामुळे चवताळलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी कालच्या लढतीत खालची पातळी गाठली. हॅरीस रौफने भारताच्या युवा फलंदाजांनाच नव्हे, तर भारतीय चाहत्यांच्या दिशेने वादग्रस्त हावभाव केले.