Suryakumar Yadav hugs and consoles Dunith Wellalage after the IND vs SL match amid the youngster’s personal loss.
esakal
IND vs SL : मन जिंकलंस सूर्या भाऊ! सामना संपल्यानंतर २२ वर्षीय खेळाडूकडे गेला अन्... मनाला स्पर्श करणारा दीड मिनिटाचा Video
भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकत रोमांचक विजयाची नोंद केली.
पथूम निसंकाने ५८ चेंडूंत १०७ धावा ठोकत भारतीय गोलंदाजांना चांगली झुंज दिली.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी भारताच्या डावात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Suryakumar consoles Dunith Wellalage after father’s death : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत शुक्रवारी मध्यरात्री रोमहर्षक विजयाची नोंद केली. श्रीलंकेने पथूम निसंकाच्या शतकाच्या जोरावर भारताच्या २०२ धावांच्या प्रत्युत्तरात २०२ धावा उभ्या केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये खेचला. भारताने या सामन्यात बाजी मारली असली तरी श्रीलंकेच्या लढाऊ बाण्याचे कौतुक होत आहे. सामन्यानंतर मात्र हृदयाला स्पर्श करणारा प्रसंग घडला... भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव श्रीलंकेच्या २२ वर्षीय दुनिथ वेल्लालागे जवळ गेला अन् त्याला घट्ट मिठी मारली.. हा व्हिडीओ सोशल मीडिया गाजवतोय.