Video Viral : हे, बरोबर नाही... विराट कोहली चिडला, शुभमन गिलसोबत वाद घातलाना दिसला, IPL 2026 Final मधील हायव्होल्टेज क्षण

Virat Kohli and Shubman Gill argument IPL 2026 Final: आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यातील एका वादग्रस्त क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यातील मैदानावरील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Virat Kohli and Shubman Gill argument IPL 2026 Final

Virat Kohli and Shubman Gill argument IPL 2026 Final

esakal

Updated on

Virat Kohli controversial catch review video: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चे जेतेपद कायम राखले.. विराट कोहली ( Virat Kohli) याच्या नाबाद ७५ धावांच्या खेळीने गुजरात टायटन्सविरुद्धची ही फायनल एकतर्फी केली. गुजरातच्या ८ बाद १५५ धावांचा बंगळुरूने १८ षटकांत सहज पाठलाग केला. पण, या सामन्यात एक असा क्षण आला होता, की विराटचा पारा चढलेला दिसला आणि तो GT चा कर्णधार शुभमन गिल याच्यासोबत वाद घालताना दिसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com