

West Indies ODI Team
Sakal
Cricket World Cup 2027 Qualification Updates: दोन वेळचे विश्वविजेते राहिलेल्या वेस्ट इंडिज संघाची गेल्या काही काळातील कामगिरी अत्यंत घसरली आहे. आता सलग दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याची टांगती तलवार वेस्ट इंडिजवर आहे, कारण आता त्यांना २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप खेळण्यासाठी पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी आयर्लंडला अफगाणिस्तानने दुसऱ्या वनडेत ९२ धावांनी पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिजला (West Indies) पात्रता फेरी (Qualifiers) खेळावी लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.