Jason Holder | West Indies vs South Africa

Jason Holder | West Indies vs South Africa

Sakal

T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली

West Indies vs South Africa, T20 World Cup: वेस्ट इंडिजने सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या, पण जेसन होल्डर आणि रोमरिओ शेफर्ड यांच्या विश्वविक्रमी भागीदारी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं.
Published on

West Set 177 Runs Target for South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत गुरुवारी अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सुपर-८ चा अत्यंत महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यावर केवळ दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचेच (WI vs SA) नाही, तर भारताचेही लक्ष्य आहे.

कारण या सामन्यानंतर भारतीय संघाला सेमीफायनलसाठी काय करावे लागेल, यासाठी चित्र स्पष्ट होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा विजय भारताला फायद्याचा ठरणार आहे, मात्र वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला, तर मात्र भारताचे टेन्शन वाढणार आहे.

मात्र, वेस्ट इंडिजने केलेली कामगिरी पाहून भारतीय चाहत्यांच्या मनात धाकधुक वाढली असेल. वेस्ट इंडिजने ८३ धावांवर ७ विकेट्स गमावल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

<div class="paragraphs"><p>Jason Holder | West Indies vs South Africa</p></div>
T20 World Cup 2026: पाकिस्तान स्पर्धेतून 'आऊट'? न्यूझीलंडच्या विजयाने वाढवलंय टेन्शन, पाहा कसं आहे समीफायनलसाठी समीकरण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com