Duleep Trophy 2025 : ऋतुराज गायकवाडचे शतक; आशिया चषक स्पर्धेतून वगळलेल्या Shreyas Iyerला अपयश, उडाला त्रिफळा

Ruturaj Gaikwad Shines with Century: आशिया चषक २०२५ च्या भारतीय संघातून वगळलेल्या श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी उपांत्य सामन्यातही निराशा केली. पण, ऋतुराज गायकवाडने शतक झळकावले.
RUTURAJ GAIKWAD HITS CENTURY

RUTURAJ GAIKWAD HITS CENTURY

esakal

Updated on
Summary
  • आशिया चषक संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरवर दुलीप ट्रॉफीत स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव होता.

  • आर्य देसाई व ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली.

  • ऋतुराज गायकवाडने शतक झळकावत पश्चिम विभागाचा डाव सावरला.

Shreyas Iyer performance in Duleep Trophy 2025 semi-final : आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून श्रेयस अय्यरला वगळल्यानंतर बराच गोंधळ झाला. आयपीएल, रणजी करंडक, देशांतर्गत स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करूनही श्रेयसला स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. पण, त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळेच दुलीप ट्रॉफीत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, त्यांच्या वाट्याला निराशा आली. मात्र, ऋतुराज गायकवाडने ( RUTURAJ GAIKWAD HITS CENTURY) किल्ला लढवला आणि शतक झळकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com