नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Rajat Patidar stunning catch to dismiss Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीचा झंझावात एका अविश्वसनीय झेलने थांबला. मध्य विभागाचा कर्णधार आणि RCBचा कर्णधार राजत पाटीदार याने घेतलेला भन्नाट झेल सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Rajat Patidar stunning catch RCB captain viral video

Rajat Patidar stunning catch to dismiss Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi wicket viral video: पूर्व विभाग विरुद्ध मध्य विभाग यांच्यातल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामन्यात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami) अविश्वसनीय झेल नंतर रजत पाटीदारने ( Rajat Patidar) क्षेत्ररक्षणात चपळता आणि अचूकता दाखवली. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे वादळ त्याच्या या कामगिरीमुळे रोखले गेले आणि मध्य विभागाला महत्त्वाची विकेट मिळवता आली. पूर्व विभाग अजूनही विजयाच्या दिशेने कूच करत असला तरी सामन्याच्या पहिल्या तीन डावांत बरीच वळणं पाहायला मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com