Vaibhav Sooryavanshi Next Match : आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपलं, आता वैभव सूर्यवंशी कधी व कुठे खेळताना दिसणार? जाणून घ्या टीम इंडियाचं पुढील वेळापत्रक

When will Vaibhav Sooryavanshi play his next match? आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील भारत अ संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंका अ संघाविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव झाल्याने वैभव सूर्यवंशीलाही आता पुढील स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागणार आहे..
India vs Sri Lanka 2026 full schedule and fixtures

India vs Sri Lanka 2026 full schedule and fixtures

esakal

Updated on: 

India vs Sri Lanka 2026 full schedule and fixtures : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा टीम इंडियाचा सुपरस्टार झाला आहे... त्यामुळे त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेतील त्याच्या २०४ धावांच्या रेकॉर्ड ब्रेकींग खेळीने, तर सर्वांना वेड लावले. पण, भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यामुळे INDIA A VS PAKISTAN A अशा फायनचे स्वप्न भंग झाले. मग, आता वैभव पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत कधी व कुठे दिसेल, याची उत्सुकता आहे. भारताची मर्यादित षटकांची क्रिकेट सामन्यांची मालिका पुढील महिन्यात होणार आहे आणि त्याचे वेळापत्रक समोर आले आहे.

Loading content, please wait...