

Who is Aryaman Birla Former Cricketer
Esakal
Who is Aryaman Birla: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवे मालक मिळाले आहेत. राजस्थान रॉयल्सनंतर आरसीबी संघाचेही मालकी हक्क विकण्यात आले. आरसीबीची मालकी आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट वेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांनी विकत घेतलीय. यात आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक असलेले आर्यमन बिर्ला हे आरसीबीचे अध्यक्ष असणार आहेत. एकेकाळी राजस्थान रॉयल्सकडून खेळलेले आणि वयाच्या २२ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आर्यमन यांच्याकडे आरसीबीच्या फ्रँचाइजीच्या अध्यक्षपदाची सूत्रे येणार आहेत. तर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सत्यन गजवानी उपाध्यक्ष असतील.