Hardik Pandya sparks rumours of dating Mahieka Sharma
esakal
हार्दिक पांड्याचं नताशा स्टँकोव्हिचसोबतचं लग्न मोडल्यानंतर त्याचं नाव जास्मिन वालियासोबत जोडले गेले होते.
जास्मिनसोबतचं नातं संपुष्टात आल्यावर आता त्याचं नाव मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबत जोडलं जात आहे.
माहिका शर्मा ही लोकप्रिय मॉडेल असून तिने म्युझिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्म्स आणि अनेक ब्रँडसोबत काम केलं आहे.
Hardik Pandya’s love life is once again in headlines : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचं पुन्हा एकदा ब्रेक अप झालं अन् त्याच्या आयुष्यात नवी अभिनेत्री आल्याची जोरदार चर्चा आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी हार्दिक टीम इंडियासह दुबईत आहे आणि त्याच्या नव्या प्रेमाची चर्चा रंगली आहे. नताशा स्टँकोव्हिचसोबतची लग्नगाठ मोडल्यानंतर हार्दिक गायिका जास्मिन वालियाच्या प्रेमात पडला होता. दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते, परंतु आता तिच्यासोबतही त्याचं नातं संपुष्टात आले आहे. आता त्याचं नाव मॉडेल व अभिनेत्री महिका शर्मा ( Mahieka Sharma) हिच्यासोबत जोडलं जात आहे. त्यामुळे माहिका शर्मा नेमकी कोण याची उत्सुकता लागली आहे.