WHO IS NIKHIL CHAUDHARY? BBL STAR REGISTERED AS INDIAN PLAYER
esakal
Nikhil Chaudhary connection with Shubman Gill and Punjab cricket : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावासाठी ३५० खेळाडूंची नावं निश्चित केली गेली आहे. यापैकी फक्त ७७ खेळाडूंना आयपीएल २०२६ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. यात ३१ जागा या परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. १६ डिसेंबरला अबु धाबी येथे भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. ४० खेळाडूंनी २ कोटींच्या मुळ किमतीत स्वतःची नावं नोंदवली आहेत. यात वेंकटेश अय्यर व रवी बिश्नोई या दोनच भारतीयांचा समावेश आहे. पण, या लिलावात नोंदवणाऱ्या खेळाडूंपैकी निखिल चौधरी हे नाव चर्चेत आलं आहे आणि त्याला कारणही तसेच आहे.