

Sakib Hussain |SRH
Sakal
SRH vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत पहिल्या टप्प्यात अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी विक्रमी कामगिरीही केली आहे. यामध्ये आता २१ वर्षीय साकिब हुसैनचाही (Sakib Hussain) समावेश झाला आहे.
सोमवारी (१३ एप्रिल) झालेल्या सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals) संघासाठी त्याने पदार्पण केले. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
हैदराबादने राजस्थानला ५७ धावांनी पराभूत करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. हैदराबादसाठी प्रफुल हिंगे (Praful Hinge) आणि साकिब हे दोन्ही पदार्पणवीर चमकले. या दोघांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या मोजक्या गोलंदाजांच्या यादीत त्यांचा समावेश झाला.