Sanjog Gupta, the Indian ICC representative
esakal
आशिया चषक २०२५ मध्ये भारताकडून पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय खेळाडूंवर व सामनाधिकाऱ्यांवर आरोप केले.
पीसीबीने अँडी पायक्रॉफ्ट यांना निलंबित करून रिची रिचर्डसन यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.
त्यांनी यूएईविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यामुळे सामना एक तास उशीराने सुरू झाला.
How Sanjog Gupta exposed Pakistan’s false claims in Asia Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाला आशिया चषक स्पर्धेत भारताकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय खेळाडू हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रुममध्ये निघून गेले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आधी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव व खेळाडूंवर आरोप केले. शिवाय सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यांनी यूएईविरुद्धच्या लढतीवर बहिष्काराची धमकीही दिली. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) मध्यस्थी करून पीसीबीची ही नौंटकी थांबवली. PAK vs UAE सामना एक तास उशीराने सुरू झाला आणि पाकिस्तानने विजय मिळवून सुपर ४ मध्ये स्थान पक्के केले.