

Urvil Patel | CSK | IPL 2026
Sakal
IPL 2026, CSK vs LSG Marathi News: रविवारी (१० मे) चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सला ५ विकेट्सने पराभूत केले. चेन्नईचा हा सहावा विजय असल्याने त्यांनी १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आता चेन्नईनेही प्लेऑफसाठी प्रबळ दावेदारी ठोकली आहे.
दरम्यान, चेन्नईला हा विजय मिळवून देण्यात २७ वर्षीय उर्विल पटेलने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात षटकारांची बरसात करताना ऐतिहासिक कामगिरीही केली.