

Nagpur's Harsh Dube in Team India
Sakal
Team India Test Squad News: अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी व एकदिवसीय सामन्यांसाठी १५ सदस्यीय भारतीय संघात विदर्भाचा (Vidarbha) अष्टपैलू क्रिकेटपटू हर्ष दुबेची (Harsh Dubey) निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवनंतर भारताच्या कसोटी संघात निवड झालेला हर्ष हा दुसरा वैदर्भीय क्रिकेटपटू ठरला आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वातील यजमान भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) संघांदरम्यान पुढील महिन्यात एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. एकमेव कसोटी सामना ६ ते १० जूनदरम्यान चंदीगड येथे, तर एकदिवसीय लढती १४, १७ व २० जून रोजी अनुक्रमे धर्मशाला, लखनौ व चेन्नई येथे खेळल्या जाणार आहेत.