Bhausaheb Babasaheb Nimbalkar
esakal
Bhausaheb Nimbalkar missed Don Bradman world record? भारतीय क्रिकेटमधील इतिहासाची पानं चाळताना, नेहमी काही रंजक, आश्चर्यचकित करणारे किस्से वाचण्यात येतात... आपली पिढी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा यांचे किस्से ऐकून लहानाची मोठी झाली. पण, क्रिकेटला जेव्हा फार प्रसिद्धी मिळत नव्हती, तेव्हा असे अनेक दिग्गज होऊन गेले, ज्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता न संपणारी आहे. असेच एक कोल्हापूरच्या मातीतून आलेले भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर... महाराष्ट्रात असे अनेक क्रिकेटपटू ज्यांनी देशांतर्गत क्रिकेट गाजवले, परंतु त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यापैकीच एक निंबाळकर.. रणजी करंडक स्पर्धेत त्यांची नाबाद ४४३ धावांची वैयक्तिक खेळी ही या स्पर्धा इतिहासातील सर्वोत्तम खेळी आहे.