India becomes the first team to qualify for the Asia Cup 2025 Super Four
भारताने सलग दोन विजय मिळवत सुपर फोर फेरीत स्थान निश्चित केले आहे.
अ गटात पाकिस्तान आणि यूएई प्रत्येकी २ गुणांसह दुसऱ्या स्थानासाठी शर्यत करत आहेत.
पाकिस्तानने बहिष्काराची धमकी दिली असली तरी सामना न खेळल्यास यूएईला थेट सुपर फोरमध्ये प्रवेश मिळेल.
Which teams will qualify for Asia Cup 2025 Super Four: श्रीलंकेने सोमवारी आशिया चषक २०२५ स्पर्धेत हाँगकाँगवर विजय मिळवून ब गटात सुपर फोरच्या शर्यतीत आगेकूच केलीय... आतापर्यंत टीम इंडिया ही सुपर फोरमध्ये पोहोचणारी एकमेव टीम आहे आणि तीन जागांसाठी शर्यत रंगमार आहे. अ गटात सोमवारी यूएईने ४२ धावांनी ओमानचा पराभव करून पाकिस्तानचं टेंशन वाढवलं आहे. भारताविरुद्धच्या लढतीनंतर घडलेल्या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानने UAE विरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. तसे झाल्यास कोण सुपर फोरमध्ये जाईल?