Who can replace Rishabh Pant as LSG captain in IPL 2027
esakal
LSG captaincy options after Rishabh Pant resignation: रिषभ पंत याने लखनौ सुपर जायंट्स संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्याचे नाव चर्चेत असले तरी सध्या संघातीलच तीन खेळाडू शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. रिषभ पंतला LSG चा कर्णधार म्हणून अपयश आले आहे आणि IPL 2026 मध्ये संघ दहाव्या क्रमांकावर राहिला, तेच मागील पर्वात सातव्या स्थानावरून संघाने निरोप घेतला होता. रिषभच्या नेतृत्वाखाली LSG ला मागील दोन पर्वात केवळ १० सामने जिंकला आले आहेत. त्यामुळे रिषभची कर्णधारपद सोडण्याची मागणी फ्रँचायझीने तात्काळ मान्य केली. पण, आता प्रश्न येतो, की नवा कर्णधार कोण?