IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Awards Winners List & Prize Money: आयपीएल २०२६ स्पर्धा संपली असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना झाला. या सामन्यानंतर पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यातही १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा बोलबाला राहिला.
Award Winners List | IPL 2026 Final | RCB vs GT

Award Winners List | IPL 2026 Final | RCB vs GT

Sakal

Updated on

IPL 2026 Awards Winners List & Prize Money : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जिंकले. अंतिम सामन्यात बंगळुरूने गुजरात टायटन्स संघाला ५ विकेट्सने पराभूत केले आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ५० धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण हे लक्ष्य बंगळुरूने १८ षटकातच ५ विकेट्स गमावत १६१ धावा करत पूर्ण केले. बंगळुरूसाठी विराटने ४२ चेंडूत ७५ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ९ चौकार मारले.

अंतिम सामन्यानंतर विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंसह पुरस्कार विजेत्या खेळाडूंचीही सन्मान करण्यात आला. यावेळी विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २० कोटींचे बक्षीस मिळाले आहे, तर उपविजेत्या गुजरात टायटन्स संघाला १२.५० कोटींचे बक्षीस देण्यात आले आहे. तसेच दोन्ही संघातील खेळाडूंना मेडलही देण्यात आले.

सर्वोत्तम खेळाडू, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप विजेते

आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी ठरला. त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. इतकेच नाही त्याने सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम स्ट्राईक रेटसाठी कारही जिंकली. त्याने सर्वाधिक षटकारांचाही पुरस्कार जिंकला.

याशिवाय आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वाधिक धावा वैभव सूर्यवंशीने केल्याने त्याला ऑरेंज कॅप जिंकली. त्याने १६ सामन्यात ७२ षटकारांसह ४८.५० च्या सरासरीने ७७६ धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने शुभमन गिल (७३२ धावा) आणि साई सुदर्शन (७२२ धावा) यांना मागे टाकले. वैभव सूर्यवंशीला ऑरेंज कॅप जिंकण्याबद्दल १० लाखांचे रोख बक्षीसही मिळाले.

आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स गुजरात टायटन्सच्या कागिसो रबाडाने मिळवल्या आणि पर्पल कॅप जिंकली. त्याने १७ सामन्यात २९ विकेट्स घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडाने भुवनेश्वर कुमार (२८ विकेट्स) आणि जोफ्रा आर्चर (२५ विकेट्स) यांना मागे टाकले. पर्पल कॅप जिंकणाऱ्या रबाडाला १० लाखांचे बक्षीस मिळाले.

आयपीएल २०२६ मधील पुरस्कार विजेते आणि बक्षीस रक्कम

अंतिम सामन्यातील पुरस्कार

अंतिम सामन्यातील सामनावीर - विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - ५ लाख

अंतिम सामन्यातील सुपर स्ट्रायकर - वेंकटेश अय्यर (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - १ लाख

अंतिम सामन्यातील सर्वाधिक चौकार - विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - १ लाख

अंतिम सामन्यातील सर्वाधिक षटकार - विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - १ लाख

सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज - भुवनेश्वर कुमार (११ डॉट बॉल) (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

आयपीएल २०२६ हंगामाचे पुरस्कार

विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२० कोटी)

उपविजेता - गुजरात टायटन्स (१२.५० कोटी)

ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - वैभव सूर्यवंशी (७७६ धावा) (राजस्थान रॉयल्स) - १० लाख

पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - कागिसो रबाडा (२९ विकेट्स) (गुजरात टायटन्स) - १० लाख

आयपीएल २०२६ हंगामातील व्हॅल्युएबल प्लेअर (मालिकावीर) - वैभव सूर्यवंशी - १५ लाख

आयपीएल २०२६ हंगामातील उदयोन्मुख खेळाडू - वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - १० लाख

आयपीएल २०२६ हंगामातील सुपर स्ट्रायकर - वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - कार

आयपीएल २०२६ हंगामातील सर्वाधिक चौकार - साई सुदर्शन (७५ चौकार, गुजरात टायटन्स) - १० लाख

आयपीएल २०२६ हंगामातील सर्वाधिक षटकार - वैभव सुर्यवंशी (७२ षटकार, राजस्थान रॉयल्स) - १० लाख

आयपीएल २०२६ हंगामातील सर्वोत्तम झेल - मनिष पांडे (कोलकाता नाईट रायडर्स) - १० लाख

आयपीएल २०२६ हंगामातील सर्वाधिक डॉट बॉल - मोहम्मद सिराज (१७२ डॉट बॉल) (गुजरात टायटन्स) - १० लाख

आयपीएल २०२६ हंगामातील फेअर प्ले - पंजाब किंग्स - १० लाख

आयपीएल २०२६ हंगामातील सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान - हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला - ५० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com