

AxarPatel | India vs New Zealand 1st T20I
Sakal
Why Abhishek Sharma Bowls for Axar Patel: भारतीय संघाने बुधवारी (२१ जानेवारी) न्यूझीलंडला नागपूरला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ४८ धावांनी पराभूत केले. या विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
मात्र या सामन्यात भारतीय संघाच्या (Team India) चिंतेत वाढ झाली आहे, कारण या सामन्यात गोलंदाजी करत असताना उपकर्णधार अक्षर पटेलला (Axar Patel) अचानक मैदानातून बाहेर जावे लागले होते.