

Why Sharfuddoula Saikat Officiating India vs New Zealand Series
Sakal
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसात बिघडले असून याची झळ क्रिकेटलाही बसली आहे. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाऱ्याच्या घटनांनंतर बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) त्यांच्या संघातून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला काढून टाकण्याचा निर्देश दिले होते.
त्यानंतर दोन्ही देशातील क्रिकेट संबंधही बिघडल्याचे दिसत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेच्या कारणाने आगामी टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतात येणार नसल्याचे आयसीसीला सांगितले आहे.