राहुल द्रविड आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक झाले पण संघाने फक्त १४ पैकी ४ सामने जिंकले.
RR च्या कमकुवत कामगिरीमुळे संघ नवव्या स्थानावर राहिला.
फ्रँचायझीने द्रविडला मोठी भूमिका ऑफर केली होती पण त्यांनी ती नाकारली.
IPL 2025 Rajasthan Royals performance under Rahul Dravid : राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने तातडीने आयपीएल २०२५ मध्ये द्रविडची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. पण, एका वर्षाच्या आत दोघांनी एकमेकांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. द्रविडच्या कार्यकाळात RR ला आयपीएल २०२५ मध्ये काही खास कामगिरी करता आली नव्हती. १४ पैकी केवळ ४ सामने जिंकून ते नवव्या क्रमांकावर राहिले.