Sanju Samson ला पुन्हा केलं जाणार दुर्लक्षित? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'या' कारणामुळे टीम इंडियातून होऊ शकतो पत्ता कट

India ODI Squad Prediction: भारतीय संघाला १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळायचे आहे. त्याआधी भारतीय संघ २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकांसाठी संघात कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा होत आहेत.
Sanju Samson
Sanju Samson Sakal
Updated on

Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाला आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तयारीला लागावे लागणार आहे. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे. भारताचे सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेपूर्वी भारताला २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध टी२० आणि वनडे मालिका खेळायची आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडविरुद्ध होणारी भारताची अखेरची वनडे मालिका आहे, त्यामुळे त्यादृष्टीने महत्त्वाची आहे. आशात आता १२ जानेवारी रोजी भारतीय निवड समिती इंग्लंडविरुद्धच्या मालिकांसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड करणार असल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत.

Sanju Samson
बुमराह, सिराज OUT; यशस्वी जैस्वालचे वन डे पदार्पण, IND vs ENG मालिकेसाठी BCCI चा प्लॅन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com