

Will Malajczuk | U19 World Cup 2026
Sakal
Will Malajczuk Hundred in U19 WC, AUS vs JPN: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत मंगळवारी विंडहोक येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध जपान या युवा संघात सामना झाला. या सामन्यात १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाने १९ वर्षांखालील जपानला १२५ चेंडू आणि ८ विकेट्स राखून मोठा विजय संपादन केला.
ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा शिल्पकार विल मालाज्झुक (Will Malajczuk) ठरला. त्याने या सामन्यात विश्वविक्रमी शतक केले.
या सामन्यात जपानने ऑस्ट्रेलियासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने २९.१ षटकात दोनच विकेट गमावत पूर्ण केला.