MI vs RR Live: वैभव सूर्यवंशी vs जसप्रीत बुमराह... लढत पाहण्यासाठी उत्सुक आहात, पण सामना होणार की नाही? हे आधी घ्या जाणून

IPL 2026 MI vs RR Marathi Cricket News: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील बहुचर्चित सामना पावसामुळे धोक्यात आला आहे. Guwahati येथे सध्या ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या सामन्यात Jasprit Bumrah विरुद्ध Vaibhav Suryavanshi ही लढत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Dark clouds over Guwahati raise concerns ahead of MI vs RR IPL 2026 clash

Dark clouds over Guwahati raise concerns ahead of MI vs RR IPL 2026 clash

esakal

Updated on

Mumbai Indians vs Rajasthan Royals Cricket Marathi Update: अपराजित राजस्थान रॉयल्स इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्सचा सामना करणार आहे. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात जगातील नंबर वन गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) यांच्यातली चुरस पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. पण, या सामन्यावर पावसाचे संकट असल्याची चर्चा रंगली आहे. सोमवारी इडन गार्डनवरील कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com