wpl auction, wpl 2026 auction
esakal
Women's Premier League auction Live Marathi: महिला प्रीमिअर लीग २०२६ पर्वासाठी नवी दिल्लीत आज मेगा ऑक्शन पार पडत आहेत. पाच फ्रँचायझींनी आतापर्यंत १८ खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि ऑक्शनमध्ये १९४ भारतीय व ८३ परदेशी अशा एकूण २७७ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यापैकी फक्त ७३ खेळाडूंनाच करारबद्ध करता येणार आहेत आणि त्यातील २३ जागा या परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. सोफी डिव्हाईन, सोफी एक्लेस्टन, एलिसा हिली, अमेलिया केर, मेग लॅनिंग, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग व लॉरा वॉलव्हार्ड्ट या खेळाडूंचा Marquee खेळाडूंमध्ये समावेश केला गेला आहे.