

Women's T20 World Cup | India vs Pakistan
Sakal
Women's T20 WC, India vs Pakistan : महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघ आपल्या मोहिमेला रविवारी (१४ जून) सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे.
हा सामना एजबस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील पहिला सामना आहे. महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ नंतर दोन्ही संघ पहिल्यांदा आमने-सामने येत आहेत.