T20 WC India Semifinal Scenario : द. आफ्रिकेच्या पोरींनी बाजी मारली, भारतीय संघाची झोप उडवली; उपांत्य फेरीत कोण पोहोचणार अन् कसे?

Women's T20 World Cup Semifinal Scenarios : महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने तिसरा विजय मिळवला आहे. मात्र त्यामुळे भारतीय संघाला मात्र मोठा धक्का बसला असून उपांत्य फेरीचे समीकरण बिघडले आहे.
India Semifinal Scenario | Women's T20I World Cup 2026

India Semifinal Scenario | Women's T20I World Cup 2026

Sakal

Updated on

महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा रंगतदार झाली आहे. गुरुवारी भारतीय महिला संघाने बांगलादेशला ५ विकेट्सने पराभूत करत स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला आणि ६ गुण मिळवले. त्यामुळे भारताचे आता ६ गुण झाले आहेत. मात्र भारताच्या या विजयानंतरही दक्षिण आफ्रिका महिला संघाने भारतीय संघाला दबावात टाकले आहे.

गुरुवारीच भारताच्या विजायानंतर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्स महिला संघाला ब्रिस्टोलमध्ये झालेल्या सामन्यात ८८ धावांनी पराभूत केले आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेचाही हा ४ सामन्यांमधील तिसरा विजय आहे.

दक्षिण आफ्रिकेचेही आता ६ गुण आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ अ गटात आहेत. याच गटात स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलिया देखील आहे. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंचे सर्व ४ सामने जिंकून अव्वल क्रमांक मिळवलेला आहे.

India Semifinal Scenario | Women's T20I World Cup 2026
T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com