WPL 2024 Final
WPL 2024 Final esakal

WPL 2024 Final : फॉर्मात असलेल्या दिल्लीला अधिक संधी; आज स्मृती अन् लेनिंग पहिल्या विजेतेपदासाठी भिडणार

WPL 2024 Final DC Vs RCB : ऑस्ट्रेलियाची यशस्वी कर्णधार मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या दिल्ली कॅपीटलला आज होणाऱ्या महिला प्रीमियर लीगमध्ये विजेतेपद मिळवण्याची संधी अधिक आहे; परंतु बंगळूर संघाचे आव्हान मोडून काढणे तेवढेही सोपे नसेल.

काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बंगळूरने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळवला. गतवर्षी बंगळूर संघाचे आव्हान अगोदरच संपुष्टात आले होते.

WPL 2024 Final
IPL 2024 Robin Minz : आयपीएलमधील पहिला आदिवासी खेळाडू रॉबिन संपूर्ण हंगामालाच मुकणार; नेहराने सांगितले कारण

दिल्लीचा संघ गतवर्षीही अंतिम फेरीत दाखल झाला होता; परंतु त्यांना मुंबई इडियन्स संघाकडून सात विकेटच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या स्पर्धेत मात्र दिल्ली संघाने फारच चांगली प्रगती करणारी कामगिरी केली आणि पाच संघांच्या साखळीत आठ सामन्यातून सर्वाधिक १२ गुण मिळवत अंतिम फेरी निश्चित केली.

लेनिंगने आघाडीवर राहून आणि स्वतः चांगल्या धावा करून दिल्ली संघाचे नेतृत्व केले आहे. तिने आठ सामन्यांतून ३०८ धावा केल्या आहेत. दिल्ली संघात दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू मारिझाने काप आणि ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासेन या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाज आहेत. त्यांनी प्रत्येकी ११ विकेट्‌स मिळवल्या आहेत.

यंदाच्या स्पर्धेत साखळी सामन्यात दिल्लीचे केवळ दोन पराभव झाले, त्यातील एक पराभव मुंबई आणि दुसरा पराभव युपी वॉरियर्स संघाकडून झाला होता. बंगळूर संघाविरुद्धचे दोन्ही साखळी सामने त्यांनी जिंकलेले असल्यामुळे त्यांचे पारडे जड असेल.

WPL 2024 Final
IPL 2024 Hardik Pandya Vs Shreyas Iyer : मख्खन, ढक्कन.... आयपीएलच्या तोंडावर पांड्या अन् अय्यरचं हे चाललंय काय?

दिल्ली संघाला मोठ्या आशा तडाखेबंद फलंदाज शेफाली वर्माकडून आहे. मेघ लेनिंगसग तिच्याकडून वेगवान सलामीची अपेक्षा केली जात आहे. दिल्ली संघासाठी जेमिमा रॉड्रिग्ज हीसुद्धा तेवढीच महत्त्वाची खेळाडू आहे. ती चांगल्या फॉर्मात असली तरी आजच्या अंतिम सामन्यात तिच्याकडून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा कर्णधार लेनिंग करत आहे.

दिल्लीच्या गोलंदाजीची मदार अर्थातच जोनासेन आणि काप यांच्यावर आहेच; पण शिखा पांजे आणि डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादवकडूनही आशा आहेत. राधाने आत्तापर्यंतच्या सामन्यांत १० विकेटचे योगदान दिले आहे.

दुसऱ्या बाजूला बंगळूर संघ पाच संघात तिसरे आले होते. त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आलेला आहे. मुंबई इंडियन्सनवर पाच धावांच्या विजयामुळे त्यांना अंतिम सामना खेळण्याची संधी मिळत आहे.

अष्टपैलू एलिस पेरी बंगळूर संघासाठी हुकमी खेळाडू असेल. तिने स्पर्धेत सर्वाधिक ३१२ धावा केलेल्या आहेत तर गोलंदाजीत सात विकेटही मिळवलेल्या आहेत. मुंबई संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करताना पेरीने झळकावलेल्या ५० चेंडूंतील ६६ धावा निर्णायक ठरल्या होत्या. त्यामुळे उद्याच्या अंतिम सामन्यातही तिच्याकडून अशाच अपेक्षा असतील.

स्मृती मानधनावर लक्ष

बंगळूरसाठी कर्णधार स्मृती मानधनाच्या बॅटमधून अधिक धावा होणे महत्त्वाच्या ठरणार आहेत. स्मृतीने काही सामन्यात चांगली फलंदाजी केली तर काही सामन्यात ती अपयशी ठरलेली आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com