

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या ११ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सविरुद्ध ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा दिल्लीचा तिसरा विजय आहे. तसेच गुजरातचा तिसरा पराभव आहे.
या सामन्यात भारती फुलमालीच्या फटकेबाजीमुळे गुजरातला दिल्लीसमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवता आले होते. या लक्ष्याचा पाठलाग दिल्लीने १५.१ षटकात ४ विकेट्स गमावत १३१ धावा करून पूर्ण केला. दिल्लीसाठी जेस जोनासन आणि शफाली वर्माने मोलाचे योगदान दिले.