
Gujarat Giants vs UP Warriorz: वूमन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सने शुक्रवारी पहिल्या सामन्यात अगदी शेवटच्या क्षणी पराभवाचा सामना केला होता. पण रविवारी (१६ फेब्रुवारी) दुसऱ्या सामन्यात मात्र गुजरातने युपी वॉरियर्सला ६ विकेट्सने पराभूत करत या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
गुजरातसाठी पुन्हा एकदा कर्णधार ऍश्ले गार्डनरने महत्त्वाची अष्टपैलू कामगिरी केली. ती युपी वॉरियर्सविरुद्धही गुजरातच्या विजयाची शिल्पकार ठरली. दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांकडून झालेले ढिसाळ क्षेत्ररक्षण चर्चेचाही विषय ठरला.