
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा दुसरा सामना अत्यंत रोमांचक झाला. मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर २ विकेट्सने विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रोमांचक झाला होता. त्यामुळे हा सामना कोणाच्याही पारड्यात जाऊ शकत होता. पण अखेर दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य दिल्लीने २० षटकात ८ विकेट्स गमावत पूर्ण केले. शफलीने सुरुवातीला केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली.