
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील दुसरा सामना बडोदा येथे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे. या सामन्यात मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी नतालिया सायव्हर-ब्रंटने शानदार अर्धशतक झळकावलं. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरनेही चांगली साथ दिली होती. मात्र नंतर फलंदाजी ठेपाळल्याने मुंबईचा संघ सर्वबाद झाला.