
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस चाहत्यांना पाहायला मिळाला. तब्बल ४०० हून अधिक धावा पहिल्याच सामन्यात निघाल्या.
स्मृती मानधनाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात जायंट्स संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात अनेक विक्रमही झाले, त्याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊ.