
Gujarat Giants vs Royal Challengers Bengaluru: वूमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दणक्यात केली आहे. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. बडोदामध्ये झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात जायंट्सला ६ विकेट्सने पराभूत केले.
गुजरातने २०२ धावांचे लक्ष्य बंगळुरूसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग बंगळुरूने १८.३ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केला. वूमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही बंगळुरूने केला आहे.