

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे पहिले दोन्ही सामने रोमांचक ठरले. त्यामुळे या हंगामाची सुरुवात दणक्यात झाली आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. मात्र, या सामन्यात शेवटच्या काही षटकात तिसऱ्या पंचांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले.
झाले असे की मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून शफाली वर्माने आक्रमक खेळत चांगली सुरुवात केली होती. पण ती १८ चेंडूत ४३ धावांवर बाद झाल्यानंतर दिल्लीने कर्णधार मेग लॅनिंग (१५), जेमिमाह रोड्रिग्स (२), ऍनाबेल सदरलँड (१३) आणि एलिस कॅप्सी (१६) या स्वस्तात बाद झाल्या.