WPL 2026 लिलावात युपी वॉरियर्सने आरटीएम कार्ड वापरून दीप्ती शर्माला ३.२ कोटींना पुन्हा संघात घेतले. भारतीय व परदेशी खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या. या लिलावातून प्रत्येक संघाने २०२६ हंगामासाठी त्यांची संघबांधणी केली आहे..वूमन्स प्रीमियर लीग २०२६ (WPL) स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव गुरुवारी नवी दिल्लीमध्ये झाला. या लिलावात अनेक स्टार भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा समावेश होता. पाचही संघांना यंदा या लिलावातून संघाची बांधणी करायची होती. अनेक संघांनी अनुभवी आणि स्टार खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंवरही विश्वास दाखवला..WPL 2026 Auction Live: ३० लाखांहून थेट १.३ कोटी! गावातून आलेली २१ वर्षीय पोरगी झाली कोट्याधीश; कोण आहे Shree Charani?.दीप्ती शर्मा महागडी खेळाडूयुपी वॉरियर्सने अष्टपैलू दीप्ती शर्माला संघातून मुक्त केले होते, त्यामुळे ती या लिलावात होती. पण युपीने तिला आरटीएम कार्ड वापरून ३.२ कोटी रुपये खर्च करत पुन्हा संघात घेतले. ती २०२६ लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. तसेच ती WPL च्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिच्यापुढे स्मृती मानधना आहे. त्यांनी स्मृती मानधनाला ३.४ कोटी रुपयांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघात घेतलं आहे. याशिवाय शिखा पांडेलाही मोठी रक्कम मिळाली. तिला युपी वॉरियर्सने २.४ कोटींना संघात घेतले. श्री चरणीलाही १.३ कोटी रुपयांची बोली लागली, तिला दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतले..परदेशी खेळाडूंनाही मागणीस्टार परदेशी खेळाडूंसाठीही संघ उत्सुक असल्याचे दिसले. अष्टपैलू एमेलिया केरला मुंबईने पुन्हा एकदा संघात घेतले, जिच्यासाठी ३ कोटी रुपये मोजावे लागले. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंगला युपी वॉरियर्सने १.९ कोटी रुपयांना खरेदी केले, तर सोफी डिवाईनला गुजरात जायंट्सने २ कोटींना संघात घेतले. फोबी लिचफिल्डसाठी युपी वॉरियर्सने १.२ कोटी, तर लॉरा वुल्फार्टसाठी दिल्ली कॅपिटल्सने १.२ कोटी मोजले..६७ खेळाडूंना लागली बोलीया लिलावात एकूण ६७ खेळाडूंना बोली लागली. यामध्ये २३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंसाठी एकूण ४०.८ कोटी सर्व ५ संघांनी मिळून खर्च केले. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आता प्रत्येकी १६ खेळाडू आहे, तर गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्सचा १८ खेळाडूंचा कोटा पूर्ण झाला आहे..WPL 2026 Auction: वर्ल्ड कप गाजवणाऱ्या वुल्फार्ट - लिचफिल्टडही झाल्या कोट्यधीश! कोणत्या संघांनी केलं खरेदी?.मुंबई इंडियन्स - रिटेन खेळाडू - नतालिया सायव्हर-ब्रंट (३.५ कोटी), हरमनप्रीत कौर (२.५ कोटी), हेली मॅथ्यूज (१.७५ कोटी), अमनजोत कौर (१ कोटी), जी कामिलीनी (५० लाख).लिलावात खरेदी केलेले खेळाडू - एमेलिया केर (३ कोटी), सजीवन सजना (७५ लाख), शबनिम इस्माईल (६० लाख), निकोला कॅरे (३० लाख), सायका इशाक (३० लाख), संस्कृती गुप्ता (२० लाख), त्रिवेणी विशिष्ट (२० लाख), राहिला फिरदोस (१० लाख), पुनम खेमनार (१० लाख), नल्ला रेड्डी (१० लाख), मिली इलिंगवर्थ (१० लाख).दिल्ली कॅपिटल्स - रिटेन खेळाडू - जेमिमाह रोड्रिग्स (२.२ कोटी), मारिझान काप (२.२ कोटी), शफाली वर्मा (२.२ कोटी), ऍनाबेल सदरलँड (२.२ कोटी), निकी प्रसाद (५० लाख).लिलावात खरेदी केलेले खेळाडू - चिनाल हेन्री (१.३ कोटी), श्री चरणी (१.३ कोटी), लॉरा वुल्फार्ट (१.१ कोटी), स्नेह राणा (५० लाख), मिन्नू मणी (४० लाख), लिझाल ली (३० लाख), तानिया भाटिया (३० लाख), नंदिनी शर्मा (२० लाख), दिया यादव (१० लाख),ममता मदिवाला (१० लाख),लुसी हेमिल्टन (१० लाख).रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - रिटेन खेळाडू - स्मृती मानधना (३.५ कोटी), ऋचा घोष (२.७५ कोटी), एलिस पेरी (२ कोटी), श्रेयंका पाटील (६० लाख)लिलावात खरेदी केलेले खेळाडू - लॉरेन बेल (९० लाख), पुजा वस्त्राकर (८५ लाख), अरुंधती रेड्डी (७५ लाख), ग्रेस हॅरीस (७५ लाख), नादिन डी क्लर्क (६५ लाख), राधा यादव (६५ लाख), जॉर्जिया वॉल (६० लाख), लिन्सी स्मिथ (३० लाख), दयालन हेमलता (३० लाख), प्रेमा रावत (२० लाख RTM),गौतमी नाईक (१० लाख), प्रत्युशा कुमार (१० लाख).युपी वॉरियर्स - रिटेन खेळाडू - श्वेता सेहरावत (५० लाख)लिलावात खरेदी केलेले खेळाडू - दीप्ती शर्मा (३.२ कोटी RTM), शिखा पांडे (२.४ कोटी), मेग लॅनिंग (१.९ कोटी), फोबी लिचफिल्ड (१.२ कोटी), आशा शोभना (१.१ कोटी), सोफी इक्लेस्टोन (८५ लाख),डिएंड्रा डॉटिन (८० लाख), किरण नवगिरी (६० लाख RTM), हर्लिन देओल (५० लाख), क्रांती गौड (५० लाख, RTM), प्रतिका रावल (५० लाख),क्लो ट्रायॉन (३० लाख), शिप्रा गिरी (१० लाख), सिमरन शेख (१० लाख),तारा नॉरीस (१० लाख), सुमन मीना (१० लाख), जी त्रिशा (१० लाख).गुजरात जायंट्स - रिटेन खेळाडू - ऍश्ले गार्डनर (३.५ कोटी), बेथ मुनी (२.५ कोटी)लिलावात खरेदी केलेले खेळाडू - सोफी डिवाईन (२ कोटी), जॉर्जिया वेरहॅम (१ कोटी), भारती फुलमाली (७० लाख, RTM), काशवी गौतम (६५ लाख), रेणुका सिंग (६० लाख), किम गार्थ (५० लाख), यास्तिका भाटिया (५० लाख), डॅनी वॅट (५० लाख), तनुजा कन्वर (४५ लाख), अनुष्का शर्मा (४५ लाख), राजेश्वरी गायकवाड (४० लाख), तितास साधू (३० लाख), कनिका अहुजा (३० लाख), आयुषी सोनी (३० लाख), हॅपी कुमारी (१० लाख), शिवानी सिंग (१० लाख)..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.