

Gujarat Giants
Sakal
वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (WPL 2026) चौथ्या सामन्यात गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोमांचक विजय मिळवला. गुजरातने शेवटच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सला ४ धावांनी पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला.
मात्र जेमिमा रोड्रिग्सच्या नेतृ्त्वातील दिल्लीला (Delhi Capitals) सलग दोन दिवसात दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात दोन्ही संघांकडून मिळून ४०० हून अधिक धावा चोपल्या गेल्या. गुजरातच्या (Gujarat Gaints) विजयात सोफी डिवाईनने अष्टपैलू खेळाचं दर्शन घडवत मोलाचा वाटा उचलला.