WPL 2026 QUALIFICATION SCENARIOS
esakal
Last Chance for Mumbai Indians? WPL 2026 Playoff Race Heats Up : महिला प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने थेट फायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे. ८ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह स्मृती मानधनाचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. आता प्ले ऑफच्या दोन जागांसाठी ४ संघांमध्ये चुरस आहे. गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा आजचा सामना त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईसाठी करो वा मरो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे MI vs GG लढतीची उत्सुकता वाढली आहे.