WPL 2026 retained and released players list
esakal
WPL 2026 retained and released players list: भारतीय महिला संघाने नुकताच वन डे वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आणि या स्पर्धेत भारताच्या दीप्ती शर्माने ( Deepti Sharma) अष्टपैलू कामगिरी करून प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार जिंकला. तिने २२ विकेट्स घेतल्या आणि २१५ धावांचे योगदान दिले. एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत २० हून अधिक विकेट्स व २०० हून अधिक धावा करणारी ती पहिली खेळाडू ठरली. असे असूनही महिला प्रीमिअर लीगपूर्वी तिला यूपी वॉरियर्सने रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.