

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली असून दुसऱ्याच सामन्यात काही वादग्रस्त घटना घडल्या. १५ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्समने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. त्या सामन्यात शेवटच्या काही षटकात तिसऱ्या पंचांनी मुंबई इंडियन्सने केलेल्या धावबादच्या अपीलवर काही वादग्रस्त निर्णय दिले होते.
फलंदाज क्रिजलाईनच्या जवळ असताना स्टम्पवरील लाईट्स लागल्यानंतरही धावबाद न दिल्याने सर्वच चकीत झाले होते. त्या सामन्यानंतर थर्ड अंपायर गायत्री वेनुगोपालन यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे नक्की नियम काय आहेत, यावरही चर्चा झाली.