
महिला प्रीमियर लीगने कमालीची प्रगती केली आहे; परंतु सहभागी संघात वाढ करण्याचा आमचा नजीकच्या काळात कोणताही विचार नाही, असे मत आयपीएल आयुक्त अरुण धुमल यांनी सांगितले. ते महिला प्रीमीयर लीगच्या समितीचेही सदस्य आहेत.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी महिला प्रीमियर लीग समितीचेही प्रमुख आहेत. महिला प्रीमियर लीगचे तीन मोसम झाले आहेत. यंदाच्या तिसऱ्या मोसमात मुंबई इंडियन्सने पुन्हा विजेतेपद मिळवले.