
सलामीच्या सामन्यातच द्विशतकी धावांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या लखनऊचा सामना उद्या बेधडक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या हैदराबाद संघाविरुद्ध होत आहे. हैदराबादचे आक्रमण कसे थोपवायचे याचे मोठे आव्हान रिषभ पंत कर्णधार असलेल्या लखनऊसमोर असणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किंमत मिळालेला रिषभ पंतचा संघ पहिल्याच सामन्यात अडचणीत आला होता. गोलंदाजीत वेळीच सुधारणा केली नाही तर आगीतून फुफाट्यात पडण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकेल.