
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत युपी वॉरियर्सने शनिवारी (८ मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध १२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह युपीने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सामन्यापूर्वीच युपी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले होते. पण आता त्यांच्या विजयामुळे गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हानही संपले आहे.
युपी आणि बंगळुरू यांचे आव्हान संपल्याने आता प्लऑफमधील संघ निश्चित झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आधीच प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. याशिवाय आता मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स संघाचेही प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले आहे.