WTC 2025-27: भारताविरुद्ध हेडिंग्लेत ऐतिहासिक विजय मिळवत इंग्लंड Points Table मध्ये अव्वल; पाहा किती झाले गुण

WTC 2025-27 Points Table: इंग्लंडने हेडिंग्लेमध्ये पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतीलही इंग्लंडचा पहिला विजय ठरला.
WTC 2025-27 | England vs India, 1st Test
WTC 2025-27 | England vs India, 1st TestSakal
Updated on

इंग्लंड क्रिकेट संघाने मंगळवारी (२४ जून) भारतीय संघाविरुद्ध तेंडुलकर - अँडरसन ट्रॉफी या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. लीड्समधील हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने भारताला ५ विकेट्सने पराभूत केले.

यामुळे शुभमन गिलची कसोटी कर्णधार म्हणून मात्र पराभवाने सुरुवात झाली. हा सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत रोमांचक झाला होता, पण अखेर इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

WTC 2025-27 | England vs India, 1st Test
WTC 2025-27 च्या पहिल्याच सामन्यात दोन शतकं; SL vs BAN कसोटीत धावांचा पाऊस, दिग्गज खेळाडूचा निवृत्तीचा सामना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com