
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचे विजेतेपद दक्षिण आफ्रिकेने १४ जून रोजी जिंकले. त्यानंतर काही दिवसातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या चौथ्या पर्वाला (WTC 2025-27) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या सहा संघ चौथ्या पर्वातील त्यांच्या पहिल्या मालिका सध्या खेळत आहे.
नुकताच शनिवारी श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवला. यासोबतच श्रीलंकेने दोन सामन्यांची मालिका १-० अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.