
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात होत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोनच दिवसात थरार पाहायला मिळत आहे. पहिल्या दोन्ही दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे कधी सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, तर कधी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
आता या सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागण्याची शक्यता आहे. तरी दुसऱ्या दिवशी ऍलेक्स कॅरेने दिलेल्या लढतीमुळे ऑस्ट्रेलियाला २१८ धावांची आघाडी मिळाली आहे. आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया किती धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवणार हे पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.