Pat Cummins | WTC 2025 Final | South Africa vs Australia Sakal
Cricket
WTC 2025 Final: ६ विकेट्ससह कमिन्सने इतिहास घडवला, लॉर्ड्सवर हा पराक्रम करणारा पहिलाच ठरला; बुमराहलाही मागे टाकलं
Pat Cummins 6 Wickets Haul Records: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेत इतिहास घडवला आहे. त्याने ४ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही संघांचे पहिले डाव संपले असून दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने कर्णधारपदाला साजेशी अशी कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात ६ विकेट्स घेताना इतिहास रचला आहे.

